ख्रिसमस वर मराठी निबंध Christmas Essay In Marathi

Christmas Essay In Marathi नमस्कार मित्रांनो! आपले……या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती आणि निबंध वाचायला मिळेल. आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” ख्रिसमस नाताळ निबंध मराठी” घेवून आलोत. आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

ख्रिसमस वर मराठी निबंध Christmas Essay In Marathi

ख्रिसमस वर मराठी निबंध Christmas Essay In Marathi

आपल्या भारत देशात विविध संस्कृतीने आणि जाती धर्माने नटलेला आहे. विविध जातीचे आणि धर्माचे लोक भारत देशात गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक धर्माचा स्वतःचा विशेष असा उत्सव केव्हा सण असतो. आणि त्या सणाला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते व संपूर्ण देशभरात सर्व लोक मिळून तो सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.

भारत देशात वर्षभरात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये ख्रिसमस नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मांचा मुख्य सण आहेत. ख्रिश्चन धर्मातील सर्व लोक ख्रिसमस नाताळ हा सण खूप मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने दरवर्षी साजरा करतात. ख्रिसमस नाताळ हा ख्रिश्चन धर्माचा सर्वात मोठा आणि पवित्र मानला जाणारा प्रमुख सण आहे. भगवान येशू यांचा जन्म दिवस म्हणून ख्रिसमस नाताळ हा सण साजरा केला जातो.

आपल्या भारत देशामध्ये ख्रिसमस नाताळ हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. देवाचा पुत्र मानले जाणारे येशू प्रभूंच्या जन्माचा हा दिवस संपूर्ण देशभरात ख्रिसमस नाताळ म्हणून साजरा केला जातो. ख्रिसमस नाताळ हा सण साजरा करण्यामागचे महत्त्व किंवा कारण म्हणजे भगवान येशू यांनी ख्रिश्चन लोकांना नवीन जीवन जगण्याची शिकवण दिली. ख्रिश्चन लोकांना सर्व दुःख आणि पिडांपासून तारण केले‌.

असे म्हटले जाते की ,भगवान येशु यांचा जन्म ज्या काळात झाला त्या वेळी सर्वत्र समाजामध्ये राग, द्वेष, अंधश्रद्धा, हिंसा आणि काही वाईट रूढी परंपरा यांचे साम्राज्य पसरले होते. त्या काळामध्ये ईश्वराने येशू यांना लोकांचा देवता म्हणून धरतीवर पाठवले होते. जेणेकरून येशु अनेक लोकांचा अंधकार, अज्ञान दुःख आणि त्रास दूर करतील व लोकांना सत्याचा मार्ग दाखवतील. त्याप्रमाणेच यशस्वी आणि संपूर्ण किचन धर्मातील तसेच इतर समाजातील अंधकार आणि दुःख दूर केली आणि त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ख्रिसमस नाताळ हा सण साजरा केला जातो.

डिसेंबर महिन्याची सुरुवात होतात सर्व ख्रिश्चन धर्मामध्ये ख्रिसमस नाताळ या सणाची तयारी सुरू होते. भगवान येशू यांचे मंदिर म्हणजे चर्चला विविध रंगाच्या लायटिंग, पताका रंग करून सजविले जाते. खरातर ख्रिसमस नाताळ या सणाची तयारी एक महिना अगोदर पासूनच केली जाते.

तसेच बाजारपेठांमध्ये देखील ख्रिसमस नाताळ या सणाची तयारी मोठ्या प्रमाणात झालेले दिसते सर्व बाजारपेठा सजलेल्या असतात खेळणी, ख्रिसमस कार्ड, भेटवस्तू यांची गर्दी झालेली असते.

ख्रिसमस नाताळ या सणाचे मुख्यता म्हणजे क्रिसमस नाताळ हा सण आता वृक्षाच्या पुर्ण होऊच शकत नाही त्यामुळे ख्रिसमस नाताळ हा सण जवळ येतात सर्वजण आपापल्या घरी नाताळ वृक्षाला सजवतात. बऱ्याच काळापासून क्रिसमस झाडाला सजवण्याचे प्रथा आहे आणि आजतागायत ही प्रथा अशीच चालू आहे.

देवदार झाडाला ख्रिसमस झाड समजून त्याला सुंदर आणि आकर्षक असे सजविले जाते. असे म्हटले जाते की, ख्रिसमस झाड हे भगवान येशूचे प्रतीक आहे. त्यामुळे या सणांमध्ये ख्रिसमस झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच क्रिसमस झाडे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून वाईट विचारांपासून दूर ठेवते.

ख्रिसमस नाताळ या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सांताक्लॉज होय. विशेषता ख्रिसमस नाताळ या सणा दिवशी पाहायला मिळणारा सांताक्लॉज खहा

सर्वांना खूप आवडतो. म्हणून संताक्लोज किंवा सेंट निकोलस हा क्रिसमस नाताळ या सणाचा अविभाज्य घटक आहे. सांताक्लॉज ची एक काल्पनिक रेखा असून मराठीमध्ये याला “नाताळ बाबा” असे म्हणतात. ख्रिसमस सणांमध्ये लहान मुले सांताक्लॉज ला पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात.

काही व्यक्ती मुलांचे मनोरंजन करण्यासाठी आणि सांताक्लॉज ची कल्पनीक रेखा कायम ठेवण्यासाठी सांताक्लाॅज सारखे कपडे परिधान करतात. सांताक्लोज एक बुटकी, वृद्ध, पांढरी दाढी आलेली आणि मकमली लाल रंगाची कपडे घातलेली व डोक्यावर लाल रंगाची टोपी असलेली व चष्मा लावलेली अशी व्यक्ती असते जिच्या कडे लहान मुलांसाठी भेटवस्तू आसतात.

तसेच ख्रिश्चन लोक ख्रिसमस नाताळ या दिवशी सर्वजण नवीन कपडे घालून चर्चमध्ये जाऊन ख्रिस्ती देवाला प्रार्थना करतात. नाताळ सणाची गाणी गातात. भगवान प्रभू येशू यांच्या समोर वर्षभरात झालेल्या चुकांवर माफी मागून दिलगिरी व्यक्त करतात.

तसेच ख्रिसमस नाताळ या दिवशी सर्वजण आपापल्या नातेवाईकांना क्रिसमस कार्ड देऊन काही भेटवस्तू देऊन क्रिसमस नाताळाच्या शुभेच्छा देतात. काहीजढ भेटवस्तू म्हणून एकमेकांना केक देतात. ख्रिसमस नाताळ या सणांमध्ये केकला देखील महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे संपूर्ण सण साजरा झाल्यानंतर शेवटला केक कापतात.

अशाप्रकारे आनंदाने आणि उत्साहाने ख्रिसमस नाताळ हा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातो.

तर मित्रांनो! “ख्रिसमस वर मराठी निबंध” वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा:

Caste System Essay In Marathi

Essay On Tiger In Marathi

Essay On Makar Sankranti In Marathi

Essay On Environment In Marathi

Essay on Subhas Chandra Bose In Marathi

Share on:

hello freinds mera naam zameer hai aur mai iss website ka owner hu. aapko iss blog par technical se lekar movies - web series aur knowledge sabhi tarah ke article padhne ko milenge. aur hamari koshish hai ki aapko har tarah ki knowledge de sake. hamare blog par aane ke liye aapka bahot bahot shukriya. thank you

Leave a Comment